तिकीट मशिनचा स्फोट झाल्यानं एसटी वाहक जखमी | Sakal Media |
गोंदियात एका एसटी बसमध्ये तिकीट मशीनचा स्फोट झालाय. यात वाहक कल्पना मेश्राम यांचा हात भाजला आहे. कर्तव्यावर असताना तिकीट मशीनचा अचानक स्फोट झाला होता. त्यानंतर वाहक कल्पना यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिकीट मशीन या जुन्या झाल्यात, त्यात कंपनीसोबतचं कंत्राट संपल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. याप्रकऱणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या अपघाताला जबाबदार एसटी प्रशासन आहे की कंपनी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
#MSRTC #Ticketmachine #gondia #busconductor